संशयित चोरट्यास 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। शिवाजी नगरातील अमर चौकातील एका घरातून भांडे व पैसे चोरून नेल्याप्रकरणी प्रशांत पद्माकर एकबोटे याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याला आज न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी सकाळी 9.30 वाजता शिवाजी नगरातील अमर चौकातील रहिवासी प्रशांत अर्जुंन आहेर हे घरी नसतांना प्रशांत पद्माकर एकबोटे याने घराचे कूलूप तोडून सात डबे, तीन पातले व 900 रुपयांची रक्कम घरातून चोरून घेऊन गेला. याप्रकरणी प्रशांत आहेर याच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर पोलिसांनी सकाळीच प्रशांत एकबोटे याला अटक केली. आज बुधवारी संशयित प्रशांत एकबोटे याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्या. पाटील यांना 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.