संशयित रुग्णांचे अहवाल दुसऱ्या दिवशी आले पाहिजे; अजित पवारांचे आदेश

0

पुणे:– जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने अकरा हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे बैठक घेतली या बैठकीत रुग्णांच्या चाचण्याचे प्रमाण वाढवून प्रयोगशाळेकडे नमुने आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अहवाल आले पाहिजे असे आदेश दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा चाचण्यांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बंधनाची कडकपणे अमंलबजावणी करावी. उद्योग व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. त्या परिसरात खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.