जेएसपीएमच्या शाहू कॉलेजच्यावतीने आयोजित केलेल्या ‘इनोव्हिजन 2019’ तांत्रिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ
पिंपरी : सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याकडे असलेल्या संशोधक वृत्तींना चालना देवून नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजेत. जेणेकरून या नवनिर्मितीतूनच भविष्यात उद्योजक घडतील आणि छोटया संकल्पनेतून व्यावसायिक साम्राज्य उभे राहतील, असे प्रतिपादन मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सचे माजी महासंचालक डॉ.अनंत सरदेशमुख यांनी केले. जेएसपीएम संचलित ताथवडे शैक्षणिक संकुल येथील शाहू कॉलेजच्यावतीने आयोजित केलेल्या ‘इनोव्हिजन 2019’ तांत्रिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डेक्का लीप टेक्नॉलॉजिजचे प्रमुख अनिर्बन सरकार, टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेसचे महाव्यवस्थापक शेखर कांबळे, जेएसपीएमचे संचालक ए.के.भोसले, ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.पी.पी.विटकर, संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संकुल उप संचालक रवी सावंत, प्राचार्य डॉ.राकेश जैन, उप प्राचार्य डॉ.अविनाश देवस्थळी आदी उपस्थित होते.
काळानुसार बददले पाहिजे
हे देखील वाचा
याप्रसंगी शेखर कांबळे म्हणाले की, काळानुसार आपण बदलले पाहिजेत. अन्यथा काळ प्रवाहात टिकू शकणार नाही. आज व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ऑटोमेशन, क्लाउड कॉम्पेटिंग, डेटा ऍनेलिटीक्स आणि उत्पादनातील सुधारणा करून सातत्याने बदल करणे (इजाइल) या चौघांची सांगड घालावी लागेल. सरकार म्हणाले की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अहंकार व उद्धटपणा यांना थारा देऊ नका. जिंकणे किंवा हरणे हा आयुषयाचा भाग आहे मात्र आपण विजिगिषुवृत्तीने आपण अपयशावर मातकरू शकतो. तंत्रशिक्षणाचे उपयोजन सामाजिक समस्या निर्मुलनासाठी करण्याची क्षमता विकसित व्हावी, या दृष्टीकोनातून इनोव्हीजन-2019 या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.राकेश जैन यांनी दिली.
ड्रोन मॅनिया स्पर्धेला प्रतिसाद
या इनोव्हिजनमध्ये मॉडेल मेकिंग, अॅड मॅनिया, मूव्ही मेकिंग, ड्रोनकडुन विविध काम करून घेणारी ड्रोन मॅनिया ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली. मोबाइलला अॅप डेव्हलप, रोबोवॉर, पेपर प्रेझेन्टेशन, अॅप्टिट्यूड क्रॅकर, वेब स्ट्रुक्ट, डेटाथोन, काँट्रॅपशन्स, लेथ वॉर, सर्किट मेकिंग, फार्मा क्रॅकर, या सारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. पेटंट अँड कॉपी राइटचे महत्व सांगणार्या स्वयंम उपक्रमात शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पेटंटची माहिती, प्रदर्शन, फार्मसी विद्यार्थ्यांनी अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे आदी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना इनोव्हीजनमध्ये मांडल्या होत्या. संस्थापक-सचिव तथा आमदार डॉ.तानाजी सावंत यांचे प्रोत्साहन आणि अमुल्य मार्गदर्शन लाभते आहे. डॉ.एम.पुरी, इनोव्हिजनचे संयोजक डॉ.अजय पैठणे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा जोगदंड, प्राची भोसले, जिग्नेश पाटील, अमोल सोनकांबळे यांचे विशेष प्रयत्न लाभले. आभार डॉ. राजाभाऊ मते यांनी मानले.