जळगाव । कृषि यांत्रिकी दिनानिमित्त शुक्रवार 10 रोजी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथे संशोधक शेतकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त दिवसभर चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, अवजारांचे प्रदर्शन, शेतकरी मेळावा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विभाग, जळगाव महाराष्ट्र शासन, आत्मा तसेच कृषी अवजारे उत्पादक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 ला “कृषी यांत्रिकीकरण दिवस” साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त संशोधक शेतकर्यांचा मेळावा घेण्यात येणार असून, नाविन्यपूर्ण अवजारांचे स्टाल्स व प्रात्यक्षिके, चर्चासत्र तसेच अवजारे लघुपट इ. चा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे सकाळी 10 वा. होणार आहे. अधिक माहितीसाठी इंजी. वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ, (मोबाईल क्र. 09730696554, यांचीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.