जळगाव : संशोधन करताना प्राथमिकता जाणून घेणे अत्यंत महात्वाचे आहे. एका संशोधकाने संशोधन करतांना मुळापर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे. अविष्कार सारख्या संशोधन उपक्रमातून विद्यार्थी संशोधकाला प्रोत्साहन मिळते. त्यांना नवीन बदल करण्याची संधी मिळते. पर्यावरण पूरक व समाजभिमुख संशोधन होणे येणार्या काळात अपेक्षित आहे. संशोधनासाठी सातत्य व अंतर्गत इच्छाशक्ती असणे हीच संशोधकाची ओळख आहे असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ.गुल्शन रेलहान यांनी व्यक्त केले. जी.एच.रायसोनी महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार या संशोधन स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बी.सी.यु.डी.चे संचालक डॉ.पी.पी.माऊलीकर, अविष्कार स्पर्धेचे निरीक्षक डॉ.आर.एल.शिंदे, डॉ.डी.जी.हुंडीवाले, संचालक प्रीतम रायसोनी संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, अविष्कारचे जिल्हा समन्वयक प्रा.मकरंद वाठ उपस्थित होते.
833 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल 50 महाविद्यालयातील 833 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यात 400 संशोधन उपकरणे व 433 पोस्टर यांचा समावेश आहे. स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी तसेच शिक्षक सहभागी झाले होते. अविष्कार प्रदर्शन पोस्टर्स व मॉडेलद्वारे मांडण्यात आले.
अविष्कारातून प्रकटलेले विषय
विद्यापीठ अंतर्गत अविष्कार स्पर्धेत सद्य स्थितीतील विषयांना उजाळा देण्यात आला. यावेळी महिलांच्या विषयावर मोठ्या प्रमाणवर संशोधन करण्यात आले होते. महिलां विषयक प्रश्न, सायबर क्राईम, अपघात टाळणे, शेती पेरणी व कापणी यंत्र, बायोग्यास प्रकल्प, कृषी उत्पन वाढ, दुध प्रक्रिया मांडण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अनेक संशोधने पर्यावरण पूरक व शेतीला निगडीत होते. त्या बरोबरीने