संसदेची वित्त समिती गुरुवारी पुणे दौर्‍यावर

0

पुणे : संसदेची वित्तीय समिती 11 ते 16 मे या कलावधीत पुणे, मुंबई आणि कोची या तीन शहरांचा अभ्यास दौरा करणार आहे. या समितीचे सदस्य खासदार अनिल शिरोळे यांनी येथे ही दिली. समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या समवेत वीसहून अधिक खासदार या अभ्यास दौर्‍यात सहभागी होणार आहेत. राज्यातील प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर प्रत्यक्ष करासंबंधी चर्चा, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, एलआयसी आदी विविध संस्थांच्या अध्यक्षांबरोबर देशातील विमा आणि आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील प्रश्न व उपायांसंबंधी या दौर्‍यात विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.