संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न; तरुणाला अटक

0

नवी दिल्ली: चाकूसह संसदेत प्रवेश करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संसदेत चाकूसह प्रवेश करणाऱ्या या तरुणाचे नाव सागर इसा असल्याचे समजते. ही व्यक्ती संसदेच्या गेट क्रमांक १ मधून आत जाण्याच्या प्रयत्नात होती. या व्यक्तीला संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाचे सतर्कतेमुळे चाकु हातात असलेला तरुणाला अटक करण्यात आली. मोठा अनर्थ टळला.

सागर इसा हा दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी आहे. तो कशासाठी आला होता, चाकू घेऊन संसदेत प्रवेश करण्याचा त्याचा उद्देश काय, याबाबतही काही समजू शकलेले नाही. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.