संसद प्रशिक्षण शिबिरात मोहिदा सरपंच, उपसरपंचांची निवड

0

शहादा । शहादा -तळोदा विधान सभा मतदारसंघ संघातून पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र सरपंच संसद या तीन दिवशीत प्रशिक्षण शिबिरात मोहिदा त श (ता . शहादा ) येथील सरपंच गिरधर पाटील व उपसरपंच पुरूषोत्तम पाटील यांची निवड झाल्याचे पत्र महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी दिले. सरपंच गिरधर पाटील व उपसरपंच पुरूषोत्तम पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असणार्‍या पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने 10 , 11 व 12 डिसेंबर 2017 या कालावधीत या कॉलेजच्या प्रांगणात महाराष्ट्र सरपंच संसद आयोजित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात आपल्या गावातील सर्वांगीण विकासाची तळमळत असणार्‍या कर्तुत्ववान सरपंच व उपसरपंचाला ग्रामविकासाचा आदर्श पंचवार्षिक आराखडा तयार करता यावा, विकासासाठी भेदभाव विरहीत लोकसंघटन करता यावे, गावाच्या सर्वांगीण विकासाठी केंद्र व राज्य शासन तसेच विविध द्योगीक समूहांचे भरिव सहकार्य घेता यावे यासाठी निश्‍चित स्वरूपाचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सरपंच संसदेनेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण सोहळ्यात केंद्र व राज्य शासनातील अनुभवी मंत्री ,पदाधिकारी , अधिकारी, तसेच नामांकित उद्योगाचे संस्थापक, महाराष्ट्रातील आदर्श सरपंच संसदेत मार्गदर्शन करतील महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातुन प्रत्येकी एक याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातून केवळ 288 ग्रामपंचायत गांवाची अभ्यासपुर्वक निवड करून यातील सरपंच व उपसरपंच यांना महाराष्ट्र सरपंच संसदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंच गिरधर पाटील व उपसरपंच पुरूषोत्तम पाटील यांची निवड झाल्याने पंस सदस्य ओंकार पाटील, सातपुडा कारखान्याचे संचालक जयप्रकाश रामदास पाटील, ग्रामविकास अधिकारी के. जी. भामरे ग्रामपंचायत सदस्य विमलबाई पाटील , सयाबाई महिरे, ईश्‍वर महिरे, जितेंद्र पाटील, जाधव पाटील, सदु भील तुबां पाटिल आदींनी त्यांचे अभिनंदन होत आहे.