संसारांची राखरांगोळी रोखण्यासाठी ‘जळगाव पॅटर्न’

0

स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मांडले महापालिकेचे व्हिजन
मनपा कर्जमुक्त करण्यासह विकासनिधी आणण्यासाठी कटिबध्द
जळगाव । गेल्या सहा महिन्यात जळगाव शहरात आग लागून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याच्या चार ते पाच घटना घडल्या. आग लागल्यानंतर अग्निशमनबंब वेळेत पोहचले असते तर हानी कमी झाली असती, असा निश्कर्ष तज्ञांनी काढला, यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेचे स्थायी समिती सभापती यांनी अग्निशमनदला सोबत चर्चा करुन बंद पडलेल्या पाण्याच्या टाक्यांचे पुनर्ज्जीवन करत उंचावर नव्या टाक्या बांधून तेथून अतिजलद आपात्कालीन व्यवस्था उभे करण्याचे नियोेजन केले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून मराठेंचा हा प्रयोग जळगाव पॅटर्न म्हणून राज्यभरात नावारुपाला येईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

कर्जमुक्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा
शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार मिळून एकत्र निर्णय घेत आहोत. जाहिरनाम्यातील उद्दिष्टपूर्तीसाठी काम करीत असून 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मागील 30 ते 40 वर्षांपासून केवळ राजकारण करण्यात आले आहे. या कालावधीत केवळ भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महापालिका स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी केला. हुडको व जेडीसीसी बँकेच्या असलेल्या कर्जापोटी 4 कोटी दरमाह द्यावे लागतात. हुडकोचे कर्जांबाबत वरीष्ठांशी चर्चा करून त्याचे सेटलमेंट करणार आहोत.

शहर स्वच्छतेला प्राधान्य
शहरातील विविध अडचणी आहेत. यात महत्त्वाची अडचण ही स्वच्छतेसंदर्भांतील आहे. बीव्हीजीग्रृप सारख्या संस्थेला हे काम दिले जाणार आहे. एक मुस्त ठेक्याचा ठराव महासभेत रद्द करून प्रभाग निहाय ठेका देण्याचा ठराव झाला होता. हा ठराव पुढील महासभेत रद्द करून पुन्हा एक मुस्त ठेका देण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मराठे यांनी दिली. शहरात स्वच्छतेसाठी 1500 घरांमागे एक गाडी या हिशोबाने नवीन 85 घंटा गाड्या जीपीएस सिस्टमसह घेणार आहोत. सफाई ठेकेदाराला ह्या गाड्या भोडेतत्त्वार दिल्या जातील.

मनपा शाळांचा दर्जा वाढवणार
महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी दत्तक घेण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन मराठे यांनी केले. आ. सुरेश भोळे यांच्या सोबत शहरातील झोपडपट्टी भागाची पहाणी केली. यावेळी आ. भोळे यांनी याभागातील मुलांना दत्तक घेवून शिक्षण देणार असल्याची संकल्पना मांडली असल्याचे मराठे यांनी सांगितले. याबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करून महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील याची माहिती घेवू. जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपटराव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शाळा डिजीटल करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महापालिकेची अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण व बळकटीकरण आवश्यक
आग लागण्यासह आपतकालिन परिस्थितचा परिणामकारक समाना करण्यासाठी महापालिकेची अग्निशमन व आपत्ती निवारण विभागाचे सक्षमीकरण व बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजचेचे असल्याचे स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी सांगितले. अग्निशमन विभागाकडील फायर फायटरची संख्या तोकडी पडते तरी फायर विभागाचे एकूण 4 बंब असून त्यापैकी 2 आगीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर दोन बंब हे आरोग्य विभागाकडे शौचालय धुण्याच्या कामाकरिता देण्यात आलेले आहे. यापूर्वी शहरात चार ठिकाणी अग्निशमन केंद्राचे कार्यालय होते. गोलाणी मार्केट फायर ऑफीस, गेंदालाल मिल फायर स्टेशन, महाबळ पाण्याची टाकी, एमआयडीसी डिझेल पंप फायर स्टेशन या चार ठिकाणी एक-एक बंब कार्यरत होते. यापैकी आज महाबळ, पाण्याची टाकी व एमआयडीसी डीझेल पंपावरील कार्यलय बंद करण्यात आले असून त्याठिकाणी आज एकही बंब व कर्मचारी नाही. तरी येथे फायर स्टेशन सुरू करावे. आरोग्य विभागाकडे असलेले बंब हे पुनश्‍च कार्यालयात ठेवून कर्मचारी नेमावे व आरोग्य विभागात दोन टँकर भाड्याने लावून तेथे स्वच्छता होवू शकते. तसेच सभेत झालेल्या चर्चेप्रमाणे डिपीसीमधील बंब खरेदीकामी मनपाच्या निधींतर्गत नविन बंब खरेदी करण्यासाठी तत्काळ कार्यवाह करावी, शहरामधील अग्निशमन बंबामध्ये पाणी भरण्यासाठी स्वंतत्र्य यंत्रणा नाही. फक्त शिवाजी उद्यान येथे एक वीज पंप व गेंदालाल मिल येथे एक पंप असे दोनच ठिकाणी फायर फायटर भरण्याची व्यवस्था आहे. आचनक कुठे आग लागली असता व या दोन ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असता तर पाण्याचे टँकर भरण्याची व्यवस्था केलेली आहे. वाघून पाणी पुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा सुरू असल्याने तत्कालीन न. पा. असतांनाच्या पाण्याच्या टाकीवरून ही व्यवस्था होवू शकते. नविन पाईप लाइन आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज नाही. तेथे नविन पाईप लाईन टाकण्याची गरज आहे. फक्त फायर स्टँडला मजबूत काँक्रीट काँक्रीटचे आवरण बनवून घ्यावे. शहरातील दौलत नगर पाण्याची टाकी यावरून मोहडी रस्त्यावर पक्के फायर स्टॅड उभारायचे आहे. पिंप्राळ्याची पाणी टाकी यावर फायर स्टँड डभारयचे आहे. तसेच मेहरूण येथील पाण्याची टाकी यावरून फक्त फायर स्टँड उभे करायचे आहे. तसेच खोटे नगर पाण्याची टाकी, हरिविठ्ठल पाण्याची टाकी याठिकाणी फक्त फायर स्टँड उभे करणे गरजेचे आहे. तसेच एमआयडीसी फायर स्टेशन अग्निशमन कार्यालय मनपाच्या अस्तित्वात असलेल्या बंबापैकी प्रत्येकी 1 असे उपलब्ध करून तत्काळ शहरातील चारही ठिकाणी सुचविलेले अग्निशमन केंद्र सुरू होतील. या पिण्याच्या पाण्यांचा वापर नसल्याने त्या उपयोगात आणता येईल व विज पंपाचा खर्चही वाचेल.

गतकाळातील भ्रष्टाचारामुळे विकास खुंटला
महापालिकेच्या इतीहासात सर्वात कमी वयात स्थायी समिती सभापतीपदी वर्र्णी लागलेले जितेंद्र मराठे यांनी दैनिक जनशक्तिच्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या कामाचे व्हिजन मांडत गेल्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे शहराचा विकास कसा खुंटला, सुविधा न मिळाल्या मुळे एमआयडीसीतील उद्योग नाशिक व औरंगाबाद कडे कसे वळाले, यावर अभ्यासू व परखड मत मांडले. याप्रसंगी नगरसेवक विशाल त्रिपाठी, युवानेते कपिल पाटील, उल्हास कुळकर्णी उपस्थित होते. आजपर्यंत संघटनेत काम करीत असताना दिलेली जबाबदारी पूर्ण केल्याचे मराठे यांनी सांगितले. यामुळेच संघटनेने मला प्रथम निवडून आल्यानंतरही महत्वाचे स्थायी सभापतीपद दिले आहे. संघटनेने टाकलेला विश्‍वास सार्थपणे पेलण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्व आश्‍वासनांची पुर्तता करणार
निवडणुकीत दिलेली सर्व आश्‍वासने केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शंभर टक्केपूर्ण करू असा आशावाद मराठे यांनी व्यक्त केला. धोरणात्मक निर्णय घेतांना सर्व एकत्र असतो त्यामुळे कामेपूर्ण होतीलच असे मराठे यांनी सांगितले. चांगल्या प्रकारे शहराचा विकास करण्यासाठी संघटनाम्हणूनही पक्षाचे बांधील राहून जाहिरनाम्यात दिलेले वचनांची पूर्तता करू. आमदार निधीतून काम करतांना केवळ भाजपा नगरसेवकांच्या वार्डांत केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत विचार मांडतांना मराठे यांनी सांगितले की, आमदारांना केवळ भाजपा नगरसेवकांच्या वार्डातच नाही तर शहरातील सर्वच भागातून विकास कामे केल्याचे स्पष्ट करत विरोधक केवळ विरोध करून जिवंत असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.