शहादा । दंगलीत समाजकंटकांनी लूटमार करीत अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांचे घर जाळून टाकल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांना आधार देत त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील पुढे सरसावले असून भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांचीही साथ लाभली आहे. अपक्ष नगरसेवक रियाज कुरेशी यांनी भाजपाला पालिकेत पाठिंबा दिल्याने त्याचा राग ठेवून दंगलीत समाजकंटकानी गरीब नवाज कॉलनीतिल त्यांच्या घरातील सामना ची लूट करीत घर जाळून टाकले.या घटनेत त्यांचा परिवार बचावला. मात्र संसाराची राख़ रांगोळी झाली
माणुसकी अजुनही जिवंत
कुरेशी यांना धीर देण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जितेंद्र जमदाळे, नगरसेवक प्रशांत निकुंभ, अरविंद कुवर, अतुल जयसवाल, विनोद जैन, हितेंद्र वर्मा, दिनेश खंडेलवाल, धनराज ईशी, नीलेश मराठे, आदि पदाधिकारी गेले. कुरेशी यांचा जळीत घराची व संसाराची झालेली राख़ रांगोळी पाहून सर्वच जण अवाक् झाले आणि कुरेशी यांचा संसार व घर पुन्हा उभे करण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील पुढे सरसावले. त्यांना भाजपा पदाधिकार्यांची साथ देत संसार उभा करण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करीत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.