संस्कार जत्रेचा पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न

0

पिंपरी : संस्कार प्रतिष्ठानतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कार जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांचा श्री विश्‍वेश्‍वर ज्ञानदीप मंडळ बिजलीनगर येथे सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विद्यालय आकुर्डीने प्रतिष्ठानची ट्रॉफी पटकावली.

स्पर्धेत 32 शाळांतील एकूण 4300 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी आकुर्डी प्राथमिक विद्यालयाच्या 491 विद्यार्थ्यांनी सर्वाधिक 22 पारितोषिक पटकावली. यावेळी ब प्रभाग अधिकारी संदीप खोत, लावणीसम्राज्ञी संध्या होबाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, एकनाथ आमले, शैलेजा चौधरी, शैला बाणखेले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मोहन गायकवाड यांनी केले. राजेंद्र फडतरे, सोमनाथ पतंगे, रंजना जोशी आदींनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेंडगे यांनी केले. आभार सुधाकर खुडे यांनी मानले.