भुसावळ । उन्हाळ्यात पक्षांना पाणी न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागत असतो त्यामुळे पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी संस्कृती फाऊंंंडेशनतर्फे जलपात्राचे वितरण तसेच शहरात ठिकठिकाणी वृक्षांवर जलपात्र लावण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पक्षी पाणवठ्याच्या ठिकाणी तसेच उद्यान परिसरात आश्रयासाठी येत असतात.
मात्र याठिकाणी पक्ष्यांना पाणी उपलब्ध नसल्यामुळे पक्षी प्रजाती नष्ट होत आहे. यावर मात करण्यासाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही फाऊंडेशनतर्फे पिण्याच्या टाकाऊ बाटल्यांपासून जलपात्र बनविण्याचा मानस आहे. यासाठी 15 जणांचे पथक सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात 26 रोजी सकाळी 9 वाजता मुखर्जी उद्यानात 200 जलपात्र लावण्यात येतील. पुढील टप्प्यात एक हजार जलपात्र तयार करण्याचे काम सुरु आहे. हे जलपात्र मोफत वितरीत केले जाणार असून शाळा, महाविद्यालय, शासकीय संंस्था याठिकाणी लावण्यात येतील. मार्च ते जून या कालावधीत जलपात्रात पाणी व दाणे
टाकण्यात येतील.