यावल । स्नेहसंमेलनात स्नेह वाढला पाहिजे. तो मैत्रीचा बंध झाला पाहिजे. संगीत, नृत्य, नाट्य व शिल्प अशा विविध कला व संस्कृतीने जीवन समृध्द होते तर क्रीडेने आरोग्य तंदुरुस्त होते म्हणून जीवनात यातील एखाद्यातरी क्षेत्राशी बंध जोडून जीवन सफल करण्याचा पाया महाविद्यालयीन स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने घालावा, असे आवाहन सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केले. भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘अविष्कार 2017’ च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
उद्घाटन सोसायटीचे चेअरमन दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, जयंत चौधरी, मोहन चौधरी, हेमलता इंगळे, उपाध्यक्ष अनिल चौधरी, सचिव नितीन चौधरी, कृष्णा चौधरी, प्राचार्य डॉ. ए.एस. कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी निलेश कोळी, वृषाली चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी यांनी केला. सुत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी निलेश कोळी व वृषाली चौधरी यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन समिेती प्रमुख प्रा. डी.बी. चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डी.बी. चौधरी, प्रा. वर्षा नेहेते, प्रा. के.एस. पाटील, प्रा. जतिन मेढे, प्रा. सुनिल नेवे, किशोर चौधरी, तुळशीराम पाटील यांनी परिश्रम घेतले.