पुस्तक तातडीने रद्द करण्याबाबत भुसावळ तहसीलदारांना निवेदन
भुसावळ- अकरावी संस्कृत विषयाच्या ’संस्कृत सारीका’ नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दाखवली असून या वंशावळीत राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी दाखवण्याचा संतापजनक प्रकार घडला असून हे वादग्रस्त पुस्तक रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संभाजी बिग्रेडने भुसावळ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
‘संस्कृत सारीका’ पुस्तकात वादग्रस्त लिखाण
राज्यात 11 वी च्या संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमात लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत ‘संस्कृत सारीका’ हे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिलेले आहे. त्यांनी केलेले लिखाण अत्यंत खोटारडे व वादग्रस्त आणि इतिहासाचा विपर्यास करणारे आहे. हा जाणीवपुर्वक खोडसाळपणा असून हे वादग्रस्त पुस्तक तत्काळ रद्द करावे व सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक, प्रकाशक, वितरक व अभियान प्रमुखांवर कारवाईची मागणी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद पाटील, दीपक ठोकळे, संभाजी ब्रिगेड भुसावळ तालुकाध्यक्ष आकाश कुरकुरे, कैलास माळी, नितीन पाटील, विनोद सुरवाडे, खुशाल चव्हाण, विजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.