संस्था चालकांच्या आश्वासनाने जे.टी.महाजन तंत्र निकेतनच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

0
फैजपूर: – जे.टी.महाजन तंत्र निकेतन कर्मचार्‍यांनी सहा महिन्यांच्या पगारासाठी आत्मक्लेश आंदोलन 13 मार्चपासून  महाविद्यालय परीसरात सुरू केले होते. गुरुवारी झालेल्या चर्चेत सोमवारपर्यंत तीन पगार अदा करण्याचे आश्वासन दिल्याने  प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले.
जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राध्यापक व  कर्मचार्‍यांनी 30 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या मागण्यांविषयी प्राचार्यांना दिले होते व गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेले नाही. शासकीय नियमानुसार पगार द्यायलाच पाहिजे यासह 21 मागण्यांविषयी संस्थेकडून 2 जानेवारीपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने 3 जानेवारीपासून प्राध्यापक कर्मचार्‍यांनी आत्मक्लेश असहकार आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठींबा दिला होता.