संस्था टिकली तर सभासदांचा उत्कर्ष होत असतो .-प्रा.मकरंद पाटील 

शहादा, ता. 24: तालुका खरेदी विक्री संघाची 82वी वार्षिक सर्वसाधारण सभा खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

 

परिसराचे नेते सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अरविंद पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग अहेर, पंचायत समिती सभापती विरसिंग ठाकरे, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत पाटील, दूध संघाचे चेअरमन रविभाऊ रावल, माजी चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, माजी व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सुनिल सखाराम पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे माजी संचालक जे.पी.आप्पा पाटील, कृउबासचे माजी संचालक किशोर मोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

 

यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. विविध कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांची प्रात्यक्षिके सादर केली.

 

अध्यक्षीय समारोपात प्रा.मकरंद पाटील म्हणाले, सहकारी संस्थेवर सभासदांनी विश्वास ठेवून आर्थिक प्रगती साधली पाहिजे. संस्था टिकली तर सभासदांचा उत्कर्ष होत असतो. संस्थेच्या व्यवहारात वाढ झाली तर आपोआप विकास होत असतो. सभासदांनी आपला व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावा. नविन तंत्रज्ञानासह खते व औषधांचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे. खरेदी विक्री संघाच्या आडत दुकानातून खते, बि-बियाणे, औषधी, शेती व्यवसायासाठीची खरेदी विक्री करावी असे आवाहन त्यांनी केले.

 

सूत्रसंचालन व अहवाल वाचन मॅनेजर अनिल पाटील यांनी केले. आभार संचालक उमाकांत चौधरी यांनी मानले. सभा संपन्न होण्यासाठी कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.