संस्थेची मालमत्ता परस्पर विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

जामनेर : शहरातील न्यु इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक यांच्यासह नऊ जणांवर शाळेची कोणतीही परवानगी न घेता संस्थेची मालमत्ता परस्पर विकल्या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शाळेचे मुख्याध्यापक भीमराव चौधरी, पी. एन.नरवाडे, अरुण महाजन, व्ही. डी. पाटील, ए. बी. चौधरी, ए. पी. पाचपोळ, के. बी. पाटील, पी. बी. पालवे, एस. एस. शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत .