सईदच्या नजरकैदेविरोधात याचिका

0

लाहोर । जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिद सईद आणि अन्य चार जणांच्या नजरकैदेविरोधात लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हाफिज सईद आणि अन्य चार जणांनी ही याचिका दाखल केली आहे.

लाहोर उच्च न्यायालयाचे न्या. मोहम्मद शमीम खान यांनी या याचिका दाखल करून घेतल्या असून, उद्या यावर सुनावणी करण्यात येणार आहे. हाफिज सईद, मलिक जफर इकबाल, अब्दुर रहमान आबिद, काजी काशिफ हुसैन आणि अब्दुल्ला उबैद यांनी त्यांच्या नजरकैदेविरोधात याचिका दाखल केली. ज्येष्ठ वकील ए. के. डोगर यांनी त्यांच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, हाफिज सईदच्या प्रकरणात पाकिस्तानची भूमिका तपासावी लागेल, असे पर्रिकर म्हणाले.