चाळीसगाव / पाचोरा। मुंबई येथे बुधवार 9 ऑगस्ट रोजी होणार्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होण्याच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चा शाखा चाळीसगावच्या वतीने शहर व तालुक्यातील समाज बांधवांची मोटारसायकल रॅली शनिवारी 5 ऑगस्ट रोजी शहरातील रेल्वे स्टेशनपासुन सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजाचा जयघोष करत हातात भगवा ध्वज घेऊन शेकडो युवक मोटार सायकल रॅलीत सहभागी झाले होते. शहरभर रॅली काढुन समारोप सिग्नल पॉइंटवरील नियोजित शिवाजी महाराज पुतळा जागेवर करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्यासाठी मुबंई येथे बुधवार 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शासनाला जाग येवुन मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी मराठा जनजागृती व मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबई येथे उपस्थित राहण्यासाठी चाळीसगाव शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवार 5 ऑगस्ट रोजी रेल्वेस्टेशन पासून सकाळी 11 वाजता रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी घोषणा देत हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो मराठा समाज बांधव मोटारसायकल रॅलीत सहभागी झाल्याने शहर घोषणानी दणाणले. रॅलीची सुरुवात रेल्वे स्टेशनपासून करण्यात येवून रेल्वे स्टेशन मार्ग, स्टेशन रोड, सिग्नल पॉईट, भडगाव रोड येथून खरजई नाका, दयानंद हॉटेल, गणेश रोड बस स्थानक, सिग्नल पॉईंटपासून स्टेशनरोड तहसील कार्यालय, घाट रोड, नागद चौफुली, राजनगाव दरवाजा बाजारपेठेतून शिवाजी घाट येथे जाऊन शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले तदनंतर रॅली छोटी गुजरी, स्टेशन रोडने सिग्नल पॉईंट स्थित नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज पुताळ्या स्थानी रॅलीचा समारोप करण्यात आला.
मोर्चात तालुक्यातील समाज बांधवांनी घेतला सहभाग
यावेळी प्रमोद पाटील, लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार यांनी उपस्थित समाज बांधवांना मुंबई येथे होणार्या मोर्चात प्रसंगी उपाय योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, अरुण पाटील, भैय्यासाहेब पाटील, योगेश पाटील, बंडु पगार, भाऊसाहेब सोमवंशी, धनंजय देशमुख, उमेश पवार, सचिन स्वार, शांताराम पाटील, संजय कापसे, पंकज पाटील, कुशल देशमुख, अविनाश काकडे, बाबासाहेब पगार, मुकुंद पाटील, जगदीश चव्हाण, ज्ञानेश्वर कोल्हे, मुकुंद पवार, अजय पाटील, निवुर्ती कवडे, नाना कापसे, गणेश देशमुख, उदय पवार, पप्पु पाटील, प्रमोद वाघ, पि.एन.पाटील, कृष्णा जाधव, दत्तु पवार, राजु पगार, विलास मराठे, सचिन पवार, रुपेश पाटील, योगेश गव्हाणे, योगेश पाटील, निलेश पाटील, दिपक पाटील, निलेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अनिल पाटील, किशोर पाटील, रणजित पाटील, प्रफुल्ल पाटील, चेतन वाघ, छोटु पाटील तसेच जिल्हा दुध संघ सचालक प्रमोद पाटील, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कैलास सूर्यवंशी, पं.स. उपसभापती संजय पाटील, बाजार समिती संचालक दिनेश पाटील, बाजार समिती सचालक कल्याण पाटील, नगरसेवक घुष्णेश्वर पाटील, जयसिंग भोसले, मथुराई शिक्षण संस्थेचे सुधीर पाटील, डॉ.प्रमोद सोनवणे यांच्यासह शहर व तालुक्यातील समाज बांधवांची रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाचोर्यात मराठा क्रांती मोर्चाची भव्य रॅली
पाचोरा । मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी निघणार्या मराठा क्रांती मोर्चाची पूर्वतयारी म्हणून आज पाचोरा शहरात भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. जामनेर रोडवरील दसरा मैदानावरून रॅलीला सुरूवात झाली.
कृष्णापुरी, जामनेर रोड, देशमुखवाडी, शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पाचोरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. दरम्यान 6 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाला मुंबई येथे जाण्याच्या तयारी संदर्भात शेवटची मिटींग राजीव गांधी टाऊन हॉल येथे संध्या.4.30 वा. आयोजित केली आहे. सर्व मराठा समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे मराठा सेवा संघ अध्यक्ष दिपक पाटील यांनी आवाहन केले आहे.