रावेर- मराठा समाज आरक्षणासाठी 9 रोजी ठिकठिकाणी बंद पुकारण्यात येत असून रावेर शहरातही गुरुवार, 9 रोजी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापार्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील समाज बांधवांनी ग्रामीण भाग बंद ठेवावा व प्रशासनाने बंदबाबत सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परीषदेने आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी उपन्न बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, संभाजी बिग्रेडचे योगेश महाजन, किशोर पाटील, विलास ताठे, सूर्यभान चौधरी, डॉ.सुरेश पाटील आदी मराठा समाजबांधव उपस्थित होते.