राज्यशासन नोंदणीकृत एमसीसीईतर्फे संगणक क्षेत्रातील ४७ शिक्षकांचा गौरव
जळगाव : प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच सकारात्मकता आवश्यक आहे. सकारात्मकतेमुळे रचनात्मक कार्य घडते. तसेच एकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधने शक्य आहे, असे मत शिक्षणतज्ञ तथा डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन नोंदणीकृत महाराष्ट्र सेंटर फॉर करिअर एज्युकेशनतर्फे व.वा.वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात आयोजित संगणकक्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षकांच्या गौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एमसीसीईचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महाजन, विभागीय केंद्र प्रमुख प्रविण जाधव, राजेश परदेशी, विनोद जैन, जयेश काला, डॉ.गोपी सोरडे, सुभाष बोंद्रे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र व अमरावती विभागातल्या संगणक क्षेत्रातील ४७ शिक्षकांचा उत्कृष्ट संगणक शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. २५ संगणक शिक्षकांना रौप्य तर २२ शिक्षकांना सुवर्ण अशा एकुण ४७ शिक्षकांचा सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. दुसर्या सत्रात निवेदिका अपूर्वा वाणी यांनी व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजेश परदेशी यांनी केले. परिचय प्रविण जाधव यांनी करुन दिले. सुत्रसंचलन व आभार धनश्री कलंत्री यांनी केले. यशस्वीतेसाठी सुरजीत थोरात, निलेश पड्यार, दिग्विजय तिवारी, महेंद्र बारी, शबनम शेख, राजेश मराठे, दिपक चौधरी, देवेश ठाकुर, जगदीश कुठे, उज्वला पाटील यांनी परिश्रम घेतले.