जुन्नर: अहमदनगरमध्ये सकाळी फिरायला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना नगर-कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनांनी चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे ६ वाजता ही घटना घडली. नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर येथे मीराबाई ढमाले, कमलाबाई महादू ढमाले आणि सगुणाबाई बबन गायकर या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने या तिन्ही महिलांना जोरदार धडक दिली. त्यात या तिघी जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.