नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांमध्ये मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत देशभरात ३१.२९ क्के मतदान झाले आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत बिहारमध्ये २४.४९ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ६.५४ , राजस्थान ३३.८२ , मध्यप्रदेश ३१.४६, उत्तर प्रदेश २६.५३, पश्चिम बंगालमध्ये ३९.५५ आणि झारखंडमध्ये ३७.२४ टक्के मतदान झाले आहे.