चाळीसगाव । शहरातील अभिनव विद्यालय तसेच इतर खाजगी विद्यालयांनी चालू वर्षी 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्गासाठी शाळेच्या वेळेत बदल करावे, अशी मागणी चाळीसगाव परिसरातील पालकांकडून होत आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने लहान विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शाळा भरवण्याचा वेळेत बदल करावा अशी मागणी संबंधित शाळांचे विद्यार्थी व पालकांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती, शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील अभिनव विद्यालय व इतर खाजगी विद्यालयाने सकाळी 7:10 ते दुपारी 12:20 या दरम्यान न घेता दुपारी 12:10 ते सायंकाळी 5:20 या वेळेत भरवले जात आहे.
8 वी ते 10 या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 7:10 ते दुपारी 12:20 या वेळेत भरवली जात आहे. चक्कर येणे, उन्ह लागणे आदी बाबींचा त्रास होतो. निवेदनावर किशोर रणधीर, विवेक चौधरी, नितीन चौधरी, छोटू पवार शैलेंद्र महाजन, तेजस महाजन, पोपटराव चौधरी, भगवान मोरे , किरण पाटील राजेंद्र मांडे, सचिन स्वार, रुपेश पाटील, राजेंद्र पगार, प्रशांत ब्राह्मणकर अरुण पाटील रामलाल चौधरी, राकेश नेवे गणेश पवार सुनील पाटील आदीच्या सह्या आहेत.