नवी दिल्ली : सरकारी आकडेवारीनुसार देशातील बेहिशेबी मालमत्ता लपविणाऱ्यांवर चांगला वचक सक्तवसुली संचालनालयाने (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, ईडी) बसवला आहे. गेल्या १५ महिन्यात १२ हजार कोटी रूपयांची मालमत्ता इडीने सील करून सरकारजमा केली आहे.
मागील दहा वर्षातील एकूण कामगिरीपेक्षा जास्त चांगली कामगिरी या १५ महिन्यात झाली आहे. वित्त राज्यमंत्री संतोष कुमार यांनी संसदेत लेखी माहिती दिली की एका वर्षात इडीने ११ हजार ३२ कोटी रूपयांची मालमत्ता सरकारजमा केली आहे. २००५ ते २०१५ या दहा वर्षादऱ्म्यान केवळ ९००३ कोटी रूपयांची मालमत्ताच सरकारजमा करता आली होती. जूनपर्यंत २२ हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे. हा आकडा विजय मल्ल्याची १० हजार कोटीची संपत्ती जप्त केल्यामुळे वाढला आहे.