मुक्ताईनगर वीज कंपनी अभियंत्यांना शिवसेनेने दिला इशारा
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर असतांना व दिवाळी सणाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीची सक्तीची वीज बिल थकबाकी वसुली ताबडतोब थांबविण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलनाच्या इशार्याचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
दुष्काळग्रस्त तालुक्यात सक्तीची वसुली कशी ?
सध्या प्रत्येक घराघरात दिवाळी सणाची रेलचेल सुरू आहे. अशा परीस्थितीत वीज वितरण कंपनीद्वारा सक्तीची वीज बिल थकबाकी वसुली मोहीम जोरात सुरू असून महागाईच्या विवंचनेत सापडलेल्या नागरीक व शेतकर्यांना या सक्तीच्या वसुलीचा भयंकर त्रास होत आहे. त्यातच शासनाने मुक्ताईनगर तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात सक्तीची वसुली आपण करु शकत नाही. यानंतरही आपल्या विभागाने नागरीक व शेतकर्यांना वसुलीचा जाच दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणार्या परीणामास आपले प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, तालुका संघटक प्रवीण चौधरी, युवा सेना तालुका प्रमुख सचिन पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, विधानसभा संघटक अमरदीप पाटील, कलीम मणियार, जहीर खान, मजीद खान, शहर संघटक वसंता भलभले, दीपक खुळे, फयाज गयास, शुभम तळेले, सुनील गवते, शांताराम निंभोरेकर, चेतन पाटील, मुकेश डवले, आकाश सापधरे, शुभम शर्मा आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.