भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मंदिपासून दिलासा मिळण्यासाठी आरबीआयने यापूर्वी 1 जून व नंतर 31 ऑगस्टपर्यंत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. असे असलेतरी शहरातील अनेक फायनान्स कंपन्या व त्यांचे अधिकारी घर बांधण्यासाठी दिलेले कर्ज, वाहनासाठी दिलेले कर्ज, महिला बचत गटासह विविध कारणांसाठी दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावत धमकावत आहे शिवाय वैयक्तिकरीत्या कर्जदाराला कार्यालयात बोलावत असून वेळप्रसंगी कर्जदाराच्या घरी जावून त्यांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय कजार्चा हप्ता न लावल्याने पेनल्टी लावली जात असताना असे अधिकारी घरी येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्यामार्फत प्रांताधिकारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. दोषी फायनान्स कंपन्या, बँका व त्यांच्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडेे, विजय तुरकेले, मुकेश सोनवणेे आदींची उपस्थिती होती.