सोलापूर : भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सक्षम भारत संस्थेचा पहिला कार्यक्रम मौजे कुसळंब ता. बार्शी जि. सोलापूर येथे संपन्न झाला. संस्थेच्या वतीने एकत्रित निधी काढून वॉटर एटीम ला लागणाऱ्या स्वच्छ पाण्याचे यंत्र बसण्यात साठी वीस हजार मदत म्हणून देण्यात आली.
वॉटर एटीम लवकरच कार्यान्वित होणार असून याचा फायदा कुसळंबसह जवळपासच्या गावांनाही देखील होणार आहे. ग्रामपंचायतीकडून संस्थेच्या सदस्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ,कार्यक्रम अध्यक्ष अनंत चौधरी ग्रामपंचायतीचे सरपंच कमलताई चौधरी उपसरपंच विजय शिंदे व सदस्य हजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून “सक्षम भारत फाऊंडेशन” यांना मान मिळाला. याप्रसंगी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले . सरपंचकडून मनोगत व्यक्त करताना संस्थेविषयी आभार मानले . तसेच ग्रामस्थानी लहान मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन व पुस्तके पुरवण्यासाठी विनंती केली आहे . बस थांबा दुरुस्ती, पाणी साठविण्यासाठी श्रमदानातून बंधारा बांधणे ,सौर पथ दिवे लावणे, सरकारी योजना माहिती व त्याचा उपयोग यावरही चर्चा झाली असून संस्था लवकरच या समस्यांवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या बरोबर मार्ग काढणार आहे.
सक्षम भारत संस्थेचे अथर्व बुडूख ,कृष्णा जाजू ,केदार पाटील ,अक्षय सवणे ,अमित भूमकर ,आनंद कुंटोज ,दीपक धेंडूले उपस्थित होते . संस्थेचा ग्रामीण विकास हा मुख्य उद्देश आहे. समाजदेणे लागतो अशा लोकांनी पुढे येऊन निधी द्यावा तसेच संस्थेच्या कार्याला हातभार लावाण्यासाठी प्रत्यक्ष कामात सहभाग नोंदवावा . अशी विनंती संस्थेकडून करण्यात आली.