सखाराम महाराजांची पायी वारी पंढरपूरकडे रवाना

0

अमळनेर । संत सखाराम महाराजांच्या जयघोषात मूखी हरीनाम जपत हातात भगवा ध्वज घेवून वाडी संस्थानची पंढरपूर साठीची पायीवारी 10 जून रोजी संत प्रसाद महाराज यांचे प्रमूख मार्गदर्शनाखाली पैलाड येथील तूळशीबागेतून निघाली. 22 दिवसाच्या मूक्कामानंतर हि दिंडी 2 जूलै ला पंढरपूरात दाखल होईल प्रसाद महाराजांच्या या दिंडीचे अखंडीत 30 वे वर्ष आहे. प्रसाद महाराज यांनी अंबर्षी महाराजांचे दर्शन घेवून प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिलांनी डोक्यावर तूळस घेवून पांडूरंगाचा जप करीत वाजंत्रीच्या तालावर वयाचे भान हरपून ठेका धरला होता.
500 हुन अधिक भाविकांनी घेतला सहभाग या पायी वारीत सूमारे 200 वारकरी सहभागी झाले आहेत. दिंडीचा पहिला मूक्काम पारोळ्याला आजचा असून तेथून आडगांव, भडगांव, नगरदेवळा, नेरी, नागद, बेलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाण, टाकळी, दौलताबाद, वाळूंज, महारूळ, पैठण, शेवगांव, पाथर्डी, धामणगाव, कडा, आष्टी, अरणगांव, जवळा करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे करकंब मार्गे 2 जूलै ला पंढरपूरात दाखल होईल. त्यांच्या दर्शनासाठी व निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली दूपारी 12 वाजता दिंडीचे प्रस्थान झाले खोकरपाट मार्गे दू 5 वाजता दिंडी सडावणला पोहचली तेथून पारोळ्याला उशिरा पहिल्या मूक्कामासाठी दाखल झाली. पारोळ्या पर्यंत 500हून अधिक भाविक पायी वारीत सहभागी झाले होते वारकर्‍यांचे सर्वांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती तर सडावण गावात मोठा भंडारा सालाबाधा प्रमाणे करण्यात आला यात वारकरींसह ग्रामस्थांनी प्रसादाचा लाभ घेतला.