सगळीकडे आरोप होत असतांना राम कदमांनी प्रसिद्धीसाठी केला खटाटोप

0

पुणे (प्रदीप चव्हाण)- दहीहंडी कार्यक्रमात एखाद्या तरुणाला जर एखादी मुलगी पसंत आली तर तीला पळवून आणेल असे व्यक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची संपूर्ण राज्यातून मागणी होत आहे. राजकीय पक्षाकडून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु आहे. दरम्यान त्यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपाला उत्तर देण्याचा खटाटोप सुरु केला आहे. त्यांनी ट्विटरवर सामान्य लोकांसाठी आरोग्य तसेच इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती व्हिडीओद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या ट्विटमध्ये यात एका व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत होता, त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज होती. त्यावेळी आमदार राम कदम यांनी शस्त्रक्रियेसाठी मदत केली होती. आमदार कदम यांच्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला असे ही महिला सांगत आहे. परंतु आज शासकीय योजनेत किडनी स्टोनची शस्त्रक्रिया मोफत होत असते, त्यामुळे कदमांनी काहीही केलेले नाही अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये घाटकोपरमध्ये १२ ठिकाणी मोफत अन्नदान केले जात असल्याचे फोटो शेअर केले आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये एक महिला आमदार राम कदम यांच्यामुळे माझ्या नवऱ्यावर बायपासची शस्त्रक्रिया झाली असे म्हणत आमदार कदम यांचे आभार व्यक्त करतांना दिसत आहे.

एकंदरीत पाहत आपल्यावर होत असलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आमदार कदम यांनी केलेला हा खटाटोप असल्याचे दिसून येते.