सगळी खाती राष्ट्रवादीला दिली तर सेनेकडे काय उरते? चंद्रकांत पाटील

0

मुंबई: राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार ३० रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अर्थखाते, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि गृहखाते पण शिवसेनेने राष्ट्रवादीला दिले तर शिवसेनेकडे काय उरते? असा प्रश्न भाजपाचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३ मंत्री शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसकडून १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शिवाजी पार्क येथे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १३ मंत्री शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसकडून १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शिवाजी पार्क येथे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या राज्याचं गृहमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असून ते मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांची नावं चर्चेत आहेत.