सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळाल्याने रयत सेनेतर्फे आभार

0

चाळीसगाव । स चखंड एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी रयत सेनेच्या वतीने स्टेशन मास्तर व डी.आर.एम. भुसावळ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे प्रशासनाच्या वतीने सचखंड एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याबद्दल रयत सेनेच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानण्यात आले असुन तशा आशयाचे आभार पत्र स्टेशन मास्तर चाळीसगाव यांना 4 मार्च रोजी देण्यात आले आहे.

व्यापारी, विद्यार्थी, नोकरदारांमध्ये मोठा आनंद
चाळीसगाव शहर हे चार जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले सर्वात मोठे तालुक्याचे ठिकाण आहे. या रेल्वे स्थानकावरुन व्यापारी, विद्यार्थी, नोकरीनिमित्त अनेक प्रवासी चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून ये जा करीत असतात. सचखंड एक्सप्रेसला 6 मार्च पासुन थांबा मिळत असल्याने प्रवाश्याना प्रवास करणे सोयी चे होणार आहे. चाळीसगांव येथे दळण वळण व व्यवसायाच्या दुष्टीने या ठिकाणी येणार्‍या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे.

सचखंड एक्सप्रेस चाळीसगावला थांबा मिळाल्याने नांदेड, मनमाड तसेच दिल्ली येथे जाण्यास प्रवाश्याची सोय होणार आहे. तसेच वेरूळ, अजिंठा, पीर मुसा कादरी बाबा, केकी मुस यांचे कलादालन व शून्याचा शोध लागलेले पाटणादेवी या सारखे प्रेक्षणीय व पर्यटन स्थळेही चाळीसगाव शहरापासून काही तासाच्या अंतरावर आहेत त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून पर्यटकाची चाळीसगावला नेहमी वर्दळ असते. त्यानुसार पर्यटकाची परवड थांबून प्रवास सुखकर होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सचखंड एक्सप्रेसला थांबा द्यावा, अशी मागणी रयत सेनेची गेल्या तीन वर्षापासून होती. रयत सेनेच्या या मागणीला योग्य तो न्याय देऊन प्रवासी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार सुरेश प्रभू व रेल्वे प्रशासनाचे रयत सेनेच्या वतीने आभार निवेदनाद्वारे मानले.

पत्र देतांना यांची उपस्थिती
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार. प्रदेश समन्वयक पि एन पाटील. प्रदेश सचिव प्रमोद वाघ. शहरअध्यक्ष दत्तु पवार. तालुका उपाध्यक्ष सुहास पाटील. समन्वयक रोहन पाटील, पवन निकुंभ, सर्वेश भोसले, शंकर जोमदे, विशाल देवरे, भूषण विसपुते, विनोद मगर, राहुल देशमुख, सागर पाटील, खेमचंद जैन, किरण देवकर, संदीप पाटील आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.