सचखंड-महानगरी एक्स्प्रेसला रावेरात थांबा मिळेना

0

लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे प्रवाशांमध्ये नाराजी; एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास प्रवाशांची गैरसोय होणार दूर

रावेर- सचखंड-महानगरी अशा एक्सप्रेस प्रवाशी गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांमधून वारंवार केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षीत धोरणामूळे प्रवाशांची मागणी धुसर होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामूळे प्रवाशी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी
रावेर रेल्वे स्थानकाहून जळगाव, औरंगाबाद,नासिक येथे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यामूळे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक वर्षा पासून सचखंड,महानगरी एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी आहे.याबाबत खासदार रक्षा खडसे यांच्याकडेही प्रवाशांनी वारंवार थांबा मिळावा अशी मागणी केली आहे.मात्र.प्रवाशांच्या या मागणीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची मागणी धुसर होत असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.यामूळे रावेर परिसरातील प्रवाश्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पॅसेंजर नियोजित वेळेवर आवश्यक
इटारसी पॅसेंजर पहाटे पाच वाजे पर्यंत खंडवा रेल्वे स्थानकावर थांबलेली असते यामूळे ती गाड़ी वेळेवर येत नसल्याने जळगाव व सूरतकडे जाणार्‍या प्रवाशांना भुसावळ येथून पॅसेंजर मिळत नाही.त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामूळे भुसावळ विभागाने पुढाकार घेवून खंडव्याकडून येणारी पँसेजर गाडी नियोजीत यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

काँग्रेसची सत्ता येताच सहा महिन्यात थांबा – डॉ.उल्हास पाटील
रेल्वे मंत्र्यांची शिफारस घेवून रेल्वे बोर्ड मार्फत गाड्यांना थांबा मिळवणे सोपे आहे मात्र पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत खासदारांच्या प्रश्नांची कोणी दखल घेत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. काँग्रेसची सत्ता स्थापन होताच पहिल्या सहा महिन्यात सचखंड, महानगरी एक्सप्रेसला थांबा मिळवला जाईल, असे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणीमूळे रेल्वेला थांबा शक्य नाही – खासदार रक्षा खडसे
तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे प्रशासनाने थांबा देण्याचा विषय बंद केला आहे. असे असूनही रेल्वे मंत्रालयाशी माझा पत्रव्यवहार सुरू असून त्यांच्याकडून अद्यापपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर थांबा मिळविण्याची मागणी आहे. परंतु यापुढे प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदार संघातील एकाच रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे .त्यामुळे तो कुठे द्यावा याबद्दल मलाच संभ्रम निर्माण झाला असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगीतले.