सचिनची मन की बात फेसबुकवर लाईव्हवर

0

मुंबई । भारताचा माजी क्रिकेट कर्णधार आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत मत व्यक्त करणार होता. पण टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायलयाने निर्दोष मुक्त केल्यावर राज्यसभेत मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे राज्यसभेत पहिल्यांदाच बोलण्यासाठी उभा राहिलेल्या सचिनला राइट टू प्लेवर बोलण्याची संधी मिळाली नाही. शुक्रवारी मात्र सचिन तेंडुलकरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. त्याने फेसबुकवर एक तेरा मिनिटाचा व्हिडीओ अपलोड केला असून त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून माणसाच्या जीवनात असलेले खेळ आणि व्यायामाचे महत्व अधोरेखित आहे.

खेळ संस्कृती रुजण्याची आवश्यकता
2020 पर्यंत जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या भारतात असणार आहे. मात्र तरुण असला म्हणजे तो निरोगी आहे असं होत नाही भारत हा जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो भारतातील सुमारे 7 कोटी 20 लाख लोक मधुमेहाने ग्रस्त आहे यामध्ये सर्वाधिक संख्या तरुणाची असून हे चिंताजनक आहे. भारतात खेळ संस्कृती रुजली तर या समस्येवर आपण निश्‍चित उपाय शोधू शकतो. सरकारने क्रिडा क्षेत्राला अधिक चालना दिली पाहिजे. ईशान्य भारतामध्ये देशातील केवळ 4 टक्के लोकसंख्या आहे मात्र तिथून मेरी कोम, सरितादेवी या सारखे अनेक नामवंत खेळाडू देशाला मिळाले आहे,आता देशभरातून असेच खेळाडू भारताला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.