मुंबई । मराठी नवीन वर्षाला गुढी पाडव्यापासून प्रारंभ होतो.त्या पाडव्या दिवशी भारतीय संघाने कांगारूना पराभूत करून विजयाची गुढी साजरी केली. त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेडूलकर यानेही आपल्या घरी गुढी उभारून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही मोठ्या जल्लोषात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आले . स्वत: सचिनेच आपल्या घरच्या पाडव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.सचिनने गुढी उभारल्यानंतर सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर त्याचबरोबर टीम इंडियालाही शुभेच्छा द्यायला सचिन विसरला नाही. पाडव्याचा हा व्हिडिओ सचिनने शेअर केल्यानंतर त्याला आतापर्यंत हजारोजणांनी लाईक केले आहे.
हा दिवस संपुर्ण राज्यासह देशात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात,उत्साहात आणि जल्लोषात नवर्षाचे स्वागत केले जाते आहे. या जल्लोषात तरूणापासून तर आजीबाईपर्यंतसह लहानमुलांनीसुध्दा शोभायात्रेत सहभागी झाले होते.