इंडियन सुपर लीगच्या केरळ, चेन्नईतील सामन्याला उपस्थित
चेन्नई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया वरियर सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे प्रचंड लोकप्रीय झाली आहे. ऊरु अदार लव्ह या मल्याळम चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे तिने अनेक नामवंतांना मागे टाकले आहे. नॅशनल क्रश ठरलेल्या प्रियाने नुकतीच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. ही भेटदेखील सोशल मीडियावर गाजत आहे. कार स्वत: प्रियाने या भेटीदरम्यानचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. इंडियन सुपर लीगच्या केरळ आणि चेन्नईमधील सामन्याला ती उपस्थित होती. तिच्या आगामी चित्रपटातील नायक रोशन अब्दुलदेखील तिच्यासोबत होता.
6 लाखांहून अधिक फॉलोअर
सचिनसोबतच्या फोटोखाली प्रियाने लेजंड इज हिअर असेही लिहीले आहे. तर इंडियन सुपर लीगच्या ट्विटर हँडलनेही सचिन आणि प्रियाचा हा फोटो पोस्ट केला आहे. केरळमधील थ्रिसूर याठिकाणी राहणारी प्रिया 18 वर्षांची असून बीकॉमच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. व्हॅलेंटाईन वीकपासून प्रियाचे तिच्या आगामी चित्रपटातील गाणे आणि त्यातील एक सीन व्हायरल होत आहे. 3 मार्चला प्रकाशित होणार्या या चित्रपटाबाबतही त्यामुळे मोठी चर्चा रंगल्याचे पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रियाला इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक जणांनी फॉलो केले आहे. त्यामुळे प्रिया वरियर हीने काइली जेनर आणि क्रिस्टीयानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांसोबत प्रसिद्धीच्या बाबतीत स्थान मिळवले आहे.