सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

0

नवी दिल्ली । क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सचिन तेंडुलकरने त्याच्या जीवनावर आधारलेल्या सचिन – अ बिलियन ड्रिम्स या सिनेमाची माहिती मोदींना दिली.

या भेटीचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केली. सचिनने मोदींना आपल्या सिनेमाची माहिती दिली आणि आशिर्वाद घेतला. असे सचिनने ट्विटरवर शेअर केले. सचिन अ बिलियम ड्रीम्स या सिनेमात सचिनचा क्रिकेटर म्हणून प्रवास आणि त्याचे वैयक्तिक आयुष्यही दाखवण्यात आले आहे. पुढच्या शुक्रवारी 26 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.