सचिवाची कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या

0

जळगाव । जेडीसीसी बँक कर्मचारी पतपेढीतील सचिवाने मंगळवारी दुपारी पतपेढीच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नामदेव मुकूंदा पाटील वय-54 रा. राधाकृष्ण नगर असे मयताचे नाव आहे. मृतदेहास जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले असून उद्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

लंच टाईम झाल्याने कर्मचारी गेले होते घरी
नामदेव मुकूंदा पाटील हे शहराटील टॉवर चौक परिसरात असलेल्या जेडीसीसी बँक कर्मचारी पतपेढीत सेक्रेटरी अर्थात सचिव या पदावर होते. तर राधाकृष्ण नगरात ते कुटूंबियांसोबत राहत होते. मंगळवारी नेहमी प्रमाणे नामदेव पाटील हे बँकेत गेले होते. दुपारी 1 वाजता बँकेचा लंच टाईम झाल्याने सर्व कर्मचारी जेवनासाठी घरी निघून गेले. परंतू सचिव नामदेव पाटील व बँकेतील शिपारी नामदेव पाटील हे दोघे कार्यालयात होते. काही वेळतानंतर नामदेव पाटील हे घरी निघून गेले. यातच शिपाई देखील जेवनासाठी घरी निघून गेला. बँकेची चावी सचिव नामदेव पाटील यांच्याकडे असल्याने त्यांनी चावी शेजारी दिली असल्याचे फोन करून शिपायस सांगितले.

कर्मचार्‍यांनी नेले रूग्णालयात
दुपारी नामदेव पाटील हे मागच्या दारातून कार्यालयात आले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिपाई नामदेव हा देखील आला. बँकेच्या पुढच्या दाराचे कुलूप उघडताच त्याला सचिव नामदेव पाटील यांनी विष प्राशन केल्याचे दिसून आले. त्याने आरडा ओरडा करत बाहेर आला. यानंतर धनंजय पाटील यांना पाटील यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यांनी लागलीच आनंदा राजाराम भंगाळे यांना घटनेची माहिती देताच ते कार्यालयात आले. सर्व कर्मचार्‍यांनी सचिव नामदेव पाटील यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.