नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना १९८४च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अटकेत मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळत त्यांना ३१ डिसेंबरच्या आत सरेंडर करण्याचे आदेश दिले आहे.
१९८४ मधील शीखविरोधी दंगली भडकविण्याचे आरोप सज्जन कुमार यांच्यावर आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली आहे. तब्बल ३४ वर्षानंतर त्यांना शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत
दिल्लीच्या राजनगर परिसरातील केहरसिंग, गुरप्रीत सिंह, रघुवेंदर सिंह, नरेंद्र पाल सिंग आणि कुलदीप सिंह यांच्या हत्येला जबाबदार ठरवीत सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे.