जळगाव – जळगाव-औरंगाबाद मार्गावरील जळगाव तोलकाट्याजवळ सुरू असलेला सट्ट्याच्या अड्डयावर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून सुमारे २०५० रूपयांचा मुद्देमाल तसेच साहित्यासह संशयितास ताब्यात घेतले. हा सट्टा शेख कदीर शेख रामनगर मेहरूण हा चालवित असल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरूद्ध अढाव यांच्या मार्गदर्शनात पथकाने आज दुपारी ०१.५० वाजता छापा टाकला असता आकडे देणारे लोक पळू लागले, त्यांचा पाठलाग करून पकडले असता त्याने आपले नाव ज्ञानेश्वर धांडे सुप्रीम कॉलनी असे सांगितले. या प्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पो.ना. सचिन मुंढे, पो.ना. विजय दामोदर पाटील, पोकॉ भरत जेठवे, पोकॉ मनोज सुरवाडे यांनी ही कारवाई केली.