फैजपूर। बाजारपेठेतील दुकानात सट्टा जुगार घेणार्या पांडुरंग नंदू पठारे (वय 30, रा. सिंधी कॉलनी) याला अटक करण्यात आली. यासह सुपडू चौधरी (रा.नशिराबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग पठारे यांच्याकडून 4 हजार 375 रुपये रोख, मोबाईल जप्त करण्यात आला असून पोलीस नायक राजेश बर्हाटे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय हेमंत सांगळे करीत आहे.