सट्टापेढीवर पोलिसांचा छापा

0

जळगाव । शहरातील गुजरालपेट्रोलपंपा समोर टिव्हीएस शोरुम शेजारी सट्ट्याच्या पेढीवर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. तिघा सटोड्यांना ताब्यात घेत रोख ऐवजसहीत मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांशी हुज्जत घालणार्‍या सट्टापेढी चालक नंरेंद्र ऊर्फ शंभु दिलीप भोसले याची अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला धारदार चाकू मिळून आला आहे. जिल्हापेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभू भोसले नामक व्यक्ती गुजरात पेट्रोल पंप परिसरात चॉपर घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी गुन्हेशोध पथकातील भास्कर पाटील, रविंद्र तायडे, राजेश मेंढे, अजीत पाटील, छगन तायडे यांना गुजराल पेट्रोपंपा जवळ शस्त्र घेऊन फिरणार्‍यास व जवळच असलेल्या सट्टा पेढीवर कारवाईसाठी रवाना केले होते.

चौघांना केली अटक
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हापेठचे पथकाने छापा टाकला असता नितीन त्र्यंबक सपकाळे(वय-40,रा.आंबेडकर नगर),शेख समद शेख कादर (45,रा.खंडेरावनगर), दिलीप लिलारा नाथाणी (वय-51,रा.शहादा.) या तिघांना कल्याण मटक्याच्या पावत्या, इतर साहित्यांसहीत दोन हजारांचा ऐवज मिळून आला. तिघांना अटक करुन विचारपुस केल्यावर हि सट्टापेढी नरेंद्र ऊर्फ शंभू दिलीप भोसले याच्या मालकीची असल्याचे तिघांनी सांगीतले. तिघांना पोलिस ठाण्यात आणत असतांना शुंभू भोसले दिसून आल्यावर पोलिसांनी त्यासही ताब्यात घेतले. यावेळी शंभु भोसले याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ चॉपर मिळून आला. यानंतर रविंद्र राजाराम तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच 2100 रूपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.