भुसावळ । शहरातील आगाखान वाड्या सट्टा-मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकून एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सट्टा मालक आशिक खान ऊर्फ मक्का खान इकबाल खान (जाममोहल्ला) यांच्या मालकीचा अड्डा असून संशयीत आरोपी शे. साबीर शे.महेमुद (26, शिवाजी नगर) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 430 रुपये रोख व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ई.आर.टी. पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हवालदार शे.लतीफ, सचिन चौधरी, उमाकांत पाटील, विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली.