जळगाव – पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना अवैध धंद्याबाबत तंबी असतांनाही शहरात सर्रासपणे सट्टा-जुगार सुरु असल्याचे चित्र आहे. दरम्यान गुुरुवारी शहर पोलिसांनी रेल्वे मालधक्क्याजवळ सट्टा व जुगार अड्डयावर छापा टाकला व चार जणांसह ताब्यात घेत 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रेल्वे मालधक्क्याजवळ काही इसम सट्टा व जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, रतनहरी गिते, हे.कॉ. भरत पाटील, संजय भालेराव, अमोल विसपुते यांनी छापा टाकला. यात विशाल प्रभाकर वाघ रा.शिवाजीनगर, गोविंदा वसंत खर्चाने रा. भोईटेनगर, सुभाष शामराव सोनवणे रा.चौघुले प्लॉट, शामलाल चंदूमल कुकरेजा रा.बाबानगर, सिंधी कॉलनी या चार जणांना ताब्यात घेत सट्टा व जुगाराच्या साहित्यासह 13 हजार 800 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. चौघांविरोधात शहर पोलिसात रतन गिते या पोलीस कर्मचार्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.