सट्टा-जुगार खेळवणार्‍या तिघे पोलीसांच्या ताब्यात

0

30 हजार 800 रूपये रोख व जुगर खेळण्याचे साधने जप्त
जळगाव – शहरातील नेरी नाक्याजवळील देशी दारूच्या दुकानाशेजारी सार्वजनिक जागेवर सट्टा आणि आकडा लावणार्‍या तिघांवर पोलीसांची छापा टाकून त्यांच्याजवळील 30 हजार 800 रूपये रोख व जुगर खेळण्याचे साधने जप्त करण्यात आले असून तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नेरी नाक्याजवळील सरकार मान्य देशी दारूच्या दुकानाशेजारी सार्वजनिक जागी आरोपी नितीन भिका महाजन रा. कासमवाडी हा सट्टा पेढीचा मालक त्याचेकरवी बिट लिहिणारा आरोपी संदीप जगन्नाथ राणे (वय-42) रा. विठ्ठल पेठ, जूने जळगाव, बिट देणारा आरोपी शेख आसिफ शेख यासीन (वय-52) रा. इंदिरानगर जवळ, शाहूनगर हे रस्तावर लोकांकडून पैसे स्विकारून आकड्यावर कल्याण मटका नावाचा सट्टा-जुगाराचपाा खेळ खेळतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील 30 हजार 800 रूपये रोख आणि सट्टा जुगाराची साधने जप्त केली आहे. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामी स.फौ. आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोना विजय पाटील, विजय नेरकर, पोकॉ मनोज सुरवाडे, भरत जेठवे यांनी कारवाई केली.