स्पोर्टस डेस्क । चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान उद्या लंडनच्या ओव्हल मैदानात महामुकाबला होणार आहे. या संघांच्या दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशी परिस्थिती सट्टे बाजारातही आहे. या मेगा इव्हेंटसाठी सट्टे बाजारातही दिवाळीसारखा झगमगाट चालू आहे. सट्टेबाजांच्या नजरेतून फायनलमध्ये कांटे की टक्करच पाहायला मिळणार आहे.
यामुळे दोन्ही टीमच्या भावात जास्त फरक नाही आहे. असे आहेत भाव.दोन्ही संघ 10 वर्षांनी आयसीसीच्या एखाद्या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये आमनेसामने आहेत. याआधी 24 सप्टेंबर 2007 रोजी वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ भिडले होते. त्या वेळीही सट्टे बाजारात धूम होती. हा सामना भारताने जिंकला होता. रविवार असल्याने फायनलवर तब्बल 2000 कोटी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, या सामन्यात 50-52चा रेट चालू आहे. भारताच्या विजयावर 1 रुपयावर 50 पैशाचा भाव चालू आहे. दुसरीकडे, पाकच्या विजयावर 52 पैशांवर 1 रुपयांचा भाव चालू आहे. याचा अर्थ हाच की पाकिस्तानच्या विजयावर सट्टेबाजांना दुप्पट रक्कम मिळेल.