जळगाव । शहरातील समतानगर भागात सट्टा-मटक्याचा अड्डा चालवला जात असल्याच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने आज दुपारी दोन वाजता अचानक छापा टाकला. आकडे लावणार्या तिन संशयीतांसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा दाखल होवुन तिघांना अटक करण्यात आली आहे.
साहित्य जप्त…
जळगाव समतानगर परिसरातील कालिंका माता मंदिरा जवळ मटक्याचा अड्डा चालवून बेकायदा जुगार खेळाला जात असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यास प्राप्त झाली होती निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील प्रदिप चौधरी, शरद पाटील, गोपाल चौधरी यांच्यासह विजय खैरे, विलास शिंदे यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास या ठिकाणी अचानक छापा मारून सचिन दादाराव अडकमोल(वय-28), गौतम साहेबराव सोनवणे (वय-31), अर्जुन गजानन सोनार (वय-31) या तिघांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावर तिघेही कल्याण मटका नावाचा बेकायदा जुगार खेळवतांना मिळून आले. त्याच्या ताब्यातून 1 हजार 550 रुपये रोख, जुगाराच्या पावत्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.