मुंबई : १९९१ मध्ये आलेला ‘सडक’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली होती. २७ वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. महेश भट्ट आता याच चित्रपटाचा दूसरा भाग घेऊन पून्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या चित्रपटात महेश भट्टचीच दुसरी मुलगी आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आलियाने हा चित्रपट साकारण्याआधी वडिल महेश भट्ट यांच्यासमोर एक अट ठेवली होती. हा चित्रपट दिग्दर्शित केला तरच यात काम करेल अशी अट ठेवली होती. वडिलांनींदेखील तिचा हा हट्ट पूर्ण करत चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.
२५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या चित्रपटात आलिया भट्ट, पूजा भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.