सडावण येथे सिमेंट नालाबांधकामाचे उद्घाटन

0

अमळनेर । आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी व जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सडावणं येथे 19.51 लक्ष निधीतून सिमेंट नालाबांधचे (31 मीटर लांबी) उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच माती नालाबांध व 16 ठिकाणी 39 लाखाचे झालेले नाला खोलीकरण पाहणी आ शिरीषदादा चौधरी, यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी.जोशी, तालुका कृषी अधिकारी बी.जी.पाटील, पी.व्ही. देसाई मंडळाधिकारी, ए.बी.पाटील कृषी सहायक, सरपंच राजीव कुमार पाटील, प्रवीण पाठक गटनेते, किरण गोसावी, सुरेंद्र पाटील, किशोर मराठे, दिलीप पाटील,दंगल पाटील, निबा पाटील, मनोहर पाटील, प्रकाश पाटील, लहू पाटील, विलास पाटील, अरुण पाटील, रामचंद्र पाटील, रंगराव पाटील, राजेंद्र पाटील, सुपडू पाटील आदी उपस्थित होते.

भविष्यात परिसरात पाणी उपलब्ध होणार
यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी मार्गदर्शन केले तर ग्रामस्थांनी झालेल्या कामांचे आभार मानले. सडावण व चाकवे परिसरात नाला खोलीकरण झाल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई होणार नाही. हाताला काम आणि शेतीला पाणी हि संकल्पना घेऊन आपल्या मातृभूमीच्या सेवेत दाखल झालेले आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी शेतीला मुबलक पाणी देण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजने व्यतिरिक्त कोटी दीड कोटी निधी नालाखोलीकरनास लावल्याने त्याचे फलित येत्या पावसाळ्यात दिसणार आहे. आपला मतदार संघ जलयुक्त करण्यासाठी चौधरी बंधूंचे हे अनोखे पाऊल असून निश्चितच त्यांचा हेतू सफल होऊन हि भूमी सुजलाम सुफलाम होईल असे चिन्ह दिसू लागले आहेत, यामुळे शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत आहे.