सणसवाडीत दंगल पीडितांच्या प्रश्‍नाबाबत ग्रामस्थांची बैठक

0

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवितत्र्यात : अद्याप नपकसानभरपाई नाही

सणसवाडी : 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भिमा व सणसवाडी येथे झालेल्या दंगलीत जमावाकडुन दगडफेक, तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती. या दंगली बाबत पोलीस प्रशासनास गावकरी मंडळींनी सहकार्य करूनही सातत्याने कोणी ना कोणी स्थानिकांच्या तक्रारी देत असून निरपराध नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दोन महिने पूर्ण होऊनही कारवाई होतच आहे. याबाबत सणसवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.6) सायंकाळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात गावची सभा घेण्यात आली होती या वेळी गावातील जवळपास 5 हजार नागरिक उपस्थित होते.

समाजकंटकांना सोडून नागरिकांना गोवले जात आहे
यावेळी उपस्थित ग्रामसभेत ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या यावेळी दंगलीत झालेल्या नुकसानीची बाबत राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सोमनाथ दरेकर यांनी भूमिका मांडली. तर सरपंच रमेश सातपुते यांनी सणसवाडी गाव अहमदनगरनगर रस्त्याच्याच्या दोन्ही बाजूंनी जळत असताना ग्रामस्थ स्वरक्षणासाठी पुढे आले होते. मात्र पोलिसांचा ससेमिरा काही संपत नाही. जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्‍वर मिडगुले यांनी सांगितले की शिक्रापुरवरून येताना सणसवाडी फाटा येथे आडवाटेने यावे लागले. दोन्ही बाजूने काही समाज कंटक जाळपोळ करत होते. या समाज कंटकांना सोडून स्थानिक नागरिकांना गोवले जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारींवरील मोबाईल नंबरचे तपासणी करावी असे आवाहन केले.

ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार
या वेळी पोलीस पाटील दत्ता माने म्हणाले, पोलीस प्रशासनास सहकार्य व शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल. तसेच राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष नामदेव दरेकर म्हणाले, पोलीस प्रशासन बरोबर सहकार्य करूनही पोलीस खर्‍या गुन्हेगारांना नजरेआड करत आहे. गेली दोन महीने ग्रामस्थांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत आपण व सर्व गावकरी बुधवारी दि 7 रोजी मंत्रालयात जाऊन मंत्रांना भेटणार आहोत. विनाकारण प्रशासन त्रास देत असल्याने भविष्यात सर्व गावकरी आंदोलन करतील असा इशारा दिला.

छोलिसांशी चर्चा निष्फळ
यावेळी पं. स.उपसभापती मोनिका हरगुडे यांनी सांगितले सणसवाडीत सर्व प्रांतातील जाती धर्माची लोक राहत असून उद्योेगनगरी विकसित होउन 35 वर्ष उलटली तरी कधी असा प्रसंग आला नाही. गावात जातीभेद नसताना काही संघटनाच्या तक्रारी घेवून जाऊन त्रास दिला जात आहे. या वेळी रांजणगाव गणपती चे ट्रस्टी विजयराज दरेकर यांनी कायदा सुव्यस्था राखत आंदोलन केले जाईल असे सांगितले. यावेळी सणसवाडी ग्रामस्थांशी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्याशी चर्चा करण्यात आली. हि चर्चा निष्फळ ठरली असल्याचे ग्रामस्थांनी संगितले.

नुकसान भरपाई नाही
कोरेगाव भिमा येथील दंगलीत एकुण 9 कोटी 64 लाख 26 हजार 265 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली. तरी दंगलीतील पंचनामे होऊनही अद्याप भरपाई माळली नाही पोलिसांनी नुकसानग्रस्थ नागरिकांना मदत मिळून देण्याऐवजी कारवाईकडे लक्ष दिले जात आहे अशी खंत सणसवाडी नागरिकांनी व्यक्त केली आहे.